उतारवयातील सुखी आणि व्यस्त दांपत्यजीवनासाठी ७ कार्ये

By June 25, 2019No Comments
Uncategorized

बुजुर्ग दांपत्यजीवन में खुश और व्यस्त रहने के लिए ७ गतिविधियां

By June 24, 2019No Comments
Uncategorized

खरे सांगायचे झाले तर स्वतःच्या जोडीदारासोबत इतकी वर्षे राहणे हीच एक सुखद गोष्ट आहे. आपल्या जीवनातील मुख्य जबाबदाऱ्या निभावल्यावर, मुले स्थिर स्थावर झाल्यावरच तर जोडीदाराबरोबर निवांतपणा अनुभवण्याची संधी मिळते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते असा बऱ्याच लोकांचा समज आहे. परंतु डोळसपणे विचार करता आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याची ही संधी असते. इतकेच नव्हे, आपल्या जोडीदाराबरोबर मिळून काही गोष्टी केल्यास हा एकत्र घालवलेला वेळ आनंद देऊ शकेल.

चला पाहूया अशा काही गोष्टी ज्या तुम्ही जोडीदारासोबत मिळून केल्यास मिळेल निखळ आनंद:

1. योग: योग ही भारताने विश्वाला दिलेली फार मोठी भेट आहे. जर आपण रोजच्या जीवनात योगासने केली तर आरोग्याला पूरक असा बदल आपल्या जीवनात घडेल. योगासनांमुळे मन एकाग्र होते तसेच सर्व स्नायू मोकळे होतात. जोडीदाराबरोबर योगासने करणे हा नक्कीच एक आनंददायी अनुभव ठरू शकेल.

2. प्रवास: फिरायला जाणे कोणाला आवडत नाही? ज्या जागा या आधी आपण फक्त फोटोत पाहिलेल्या असतात तिथे जाण्याची संधी कोण सोडेल? इतकी वर्षे फक्त कुटुंबाच्या समस्यांना तोंड देण्यातच गेलेली असतात आणि त्यानंतर जोडीदाराबरोबर हे निवांतलेपण अनुभवण्याची संधी मिळते. छोट्या-छोट्या प्रवासांची योजना आखली तर जीवन किती रोमांचक बनेल! पण लक्षात ठेवा, प्रवासादरम्यान अतिउत्साहात तुम्हाला न झेपणाऱ्या गोष्टी करू नका नाहीतर परत आल्यावर आजारपण येऊ शकेल. ज्यातून बरे होण्यास वेळ लागेल.

 आवर्जून वाचा: How to Prevent Depression in Elderly

3. स्वयं सेवा: अशा खूप साऱ्या एनजीओज आहेत जिथे तुमच्या मदतीची नितांत गरज आहे. मुक्या जनावरांपासून ते निराधार वृद्धांपर्यंत सर्वांना आर्थिक मदतीव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या मदतीची सुद्धा गरज भासते. अशा संस्थेत स्वयंसेवकांची गरज असते. तुम्ही अशा ठिकाणी जोडीदारासोबत जाऊन मदत करू शकता. दुसऱ्याला आनंद देण्यात जो आनंद असतो, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

4. स्वयंपाक करणे: चांगले जेवण कोणाला आवडणार नाही? तुम्ही जेव्हा तरुण होता, तेव्हा मुलांसाठी गडबडीत स्वयंपाक करून आणि त्यांचे डबे भरून शाळेत सोडण्याचे काम करत होता. यानंतर त्याच वेगाने तयार होऊन ऑफिसला जायची गडबड. त्यात दोन घास सवडीने खायला वेळ कुठे होता? पण आता ते दिवस सरले. आता जोडीने स्वयंपाक करा. नवीन नवीन पाककृती निवडा आणि चवीचवीने खा.

5. बागकाम: स्वतःच्या हातांनी लावलेली फुलझाडे, भाज्यांची रोपे मोठी होताना, फुलताना पाहणे हा एक आगळाच अनुभव असतो. जोडीदाराबरोबर मिळून त्यांना पाणी घालणे, वाढवणे ही कामे केल्यामुळे बागेशी आणि जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

6. खेळांची रात्र: रात्रभर मित्रांसोबत कॅरम, पत्ते खेळण्याचे दिवस तुम्हाला आठवतात का? आताही दैनंदिन व्यवहारांमध्ये वेगळेपण आणण्यासाठी वेगवेगळे खेळ तुम्ही खेळू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर आणि आजुबाजूच्या मित्रमंडळींना घरी बोलावून अशा खेळांच्या रात्रीचे नियोजन तुम्ही करू शकता. एक रात्र जागल्यावर दुसऱ्या दिवशीची कामे आरामात उशीरा उठून करा जेणेकरून थकवा येणार नाही.

7. नवी भाषा शिका: नवीन भाषा शिकणे हा तुमच्या मेंदूला ताजेतवाने आणि कार्यरत ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सहज उपलब्ध असणाऱ्या  भाषांच्या वर्गात तुम्ही प्रवेश घेऊ शकता. जोडीदाराबरोबर तुम्ही स्पर्धा करू शकता आणि एकमेकांचे मार्गदर्शनही करू शकता. जे तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा शाळेत करता आले नाही ते तुम्ही या वयात सहज करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर उत्तीर्ण होण्याचे बंधनही नाही.

यांपैकी कोणतीही गोष्ट जोडीदाराच्या साथीने करा आणि आयुष्याचा आनंद घ्या.

हे आवर्जून वाचा: What Loneliness can do to Older Adults

0

अपने साथी के साथ इतने साल बिताना अपने आप में एक बहुत ही आनंददायी बात है| जिंदगी की अहम जिम्मेदारियां निभाने के बाद, बच्चों के जीवन में स्थिरता आने के बाद ही तो ज्यादा समय अपने साथी के साथ बिताने का मौका मिलता है| सेवा-निवृत्ती के साथ कुछ लोगों के जीवन में एक खालीपन आता है, पर सही मायने में सोचा जाए तो आप इस खाली समय को जैसे आपका दिल चाहे वैसे बिता सकते है| साथ ही साथ आप अपने जीवनसाथी के साथ मिलकर कुछ गतिविधियों के जरिए  ख़ुशी से वक्त बिता सकते हैं|

आइए देखते हैं कुछ ऐसी गतिविधियां जिनके जरिए आप साथीदार के साथ खुशियां बाँट सकते हैं:

1. योग: योग भारत ने विश्व को दिया हुआ एक बेहतरीन उपहार है| अगर हम ये रोजाना जिंदगी में अपनाएं तो बहुत अच्छी बात होगी| योग से मन एकाग्र होता है और शरीर की मांसपेशियां शिथिल हो जाती है जिसके कई सारे लाभ हैं| आप अपने जीवनसाथी के साथ मिलकर इसके फायदे जरूर उठा सकते हैं वे भी घरबैठे|   

2.  यात्रा: यात्रा करना किसको पसंद नहीं है? हमने जो जगह फोटो में देखी है उस सुन्दर जगह पे जाने का मौका मिले तो कौन हाथ से जाने देगा? इतने साल पारिवारिक समस्याओं का हल ढूंढते हुए गुजारने के बाद ही तो आखिर में आप अपने साथी के साथ इतना समय बिता पाते हो| क्यों न छोटी-छोटी यात्राएं की जाएँ? ध्यान रहे कि, यात्रा के दौरान ऐसी कठिन गतिविधियां न करे जिससे थकावट महसूस हो| नहीं तो यात्रा से लौटने पर वापस तंदुरुस्त होने में ही समय लग जाएगा|

ये जरूर पढ़ें: How to Prevent Depression in Elderly

3. स्वयं सेवा: ऐसी कई सारी एनजीओज हैं जिनको पैसों के साथ साथ काम करने वाले लोगों की भी आवश्यकता है| आप अपने जीवनसाथी के साथ मिलकर ऐसी संस्थाओं में जाकर स्वयं सेवा कर सकते हैं| बेज़बान जानवरों से लेकर निराधार बुजुर्गों के लिए काम करनेवाली इन एनजीओज में काम करके आनंद के एक नए पहलु का अनुभव आप ले सकते हैं|   T

4. खाना बनाना: अच्छा खाना किसको पसंद नहीं है? आपकी जवानी में किचन में जल्दबाजी में जाकर बच्चों के लिए खाना बनाना, उनके खाने के डिब्बे भरकर उन्हें स्कुल छोड़ना, उसी रफ़्तार से तैयार होकर दफ्तर जाना इस सबमें खाने के स्वाद को चखने के लिए शांति किधर मिली होगी? इस उम्र में अपने जीवनसाथी के साथ मिलकर आप शांति से खाना बनाकर उसका स्वाद ले सकते हैं| नयी नयी रेसिपीज इस्तेमाल करके आप अपने जीवनसाथी के साथ शांति से बैठकर, बाते करते हुए भोजन का आस्वाद उठा सकते हैं|

5. बगीचे में काम: खुद के हाथों से सब्जियों एवं फूलों के पौधे लगाना एक अनूठा अनुभव है| अपने साथी के साथ मिलकर सींचा हुआ ये बगीचा आप दोनों के प्यार को और गहरा बना देगा|

6. खेलकर गुजारो रात: याद है? आप अपने दोस्तों के साथ कैरम, कार्ड्स खेलकर पूरी रात गुजारा करते थे| अपने मित्र परिवार को बुलाकर डिनर के बाद ऐसी गेम नाइट की योजना बनाया करो| हफ्ते में एक बार ऐसी गेम नाईट का आनंद उठाकर आप दूसरे दिन देर से उठ सकते हैं जिससे आपकी नींद भी पूरी हो जाएगी|

7. नई भाषा सीखें: नई भाषा सीखना आपके मस्तिष्क के लिए अच्छा व्यायाम है| अगर आप अपने साथी के साथ मिलकर ये व्यायाम करेंगे तो इस मजेदार प्रतियोगिता में कई सारे नए किस्से बन सकते हैं| आपकी पसंदीदा कोई भी भाषा चुनकर आप इसके क्लासेस लगवा सकते हैं|  इसकी प्रश्नोत्तरी रखकर एवं पढाई में एक दूसरे की मदद कर आप सीखने का आनंद उठा सकते हैं| इसमें एक मजेदार बात ऐसी भी है कि, आप पर इसमें उत्तीर्ण होने का कोई दबाव भी नहीं हैं|

आपकी इनमें से कोई भी पसंदीदा गतिविधि चुनकर अपने साथीदार के साथ इसका आनंद उठाएं|

ये जरूर पढ़ें: What Loneliness can do to Older Adults

0

Write a Comment