पन्नाशीनंतर लठ्ठपणा? या सोप्या व्यायामांनी होईल वजन कमी

By July 10, 2019July 26th, 2019No Comments
Uncategorized

दररोज वाहनाने प्रवास करून कामाच्या ठिकाणी जाणे, चरबीयुक्त पदार्थ खायला हवेत यासाठी अनारोग्यकारक खाणे, मीठसाखर जास्त खाणे, बैठे काम यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. या सगळ्यामुळे आरोग्याला हानी होते. लठ्ठपणामुळे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, हाडांची झीज होणे या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पन्नाशीनंतर व्यायाम किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्याने लठ्ठपणा वाढीस लागतो. याशिवाय अनुवंशिकता, चयापचयाची क्रिया मंदावणे, हार्मोन्समधील बदल, बसण्याची चुकीची पद्धत, अति आहार, चुकीच्या वेळी भोजन करणे यामुळे वजन वाढतेबदलती जीवनशैली ही इतकी धावपळीची आहे की मागचा पुढचा कोणताही विचार करता आपण भूक लागली की वाटेल ते खात सुटतो. जीवनशैली बदलणे सोपे नाही परंतु आहारावर नियंत्रण ठेवणे हे आपल्या हातात आहे

सारखे काहीतरी खात राहणे, भूक नसताना पावभाजी, वडापाव खाणे यामुळे जाडी वाढत राहते. मधेच भूक लागल्याने खाण्याशिवाय पर्याय नसतो. परंत, असे अरबट चरबट खाण्याऐवजी जर सफरचंद, संत्रे यांसारखी फळे, गूळशेंगदाणे, भिजवलेले बदाम किंवा मनुका खाल्ल्यास तब्येतीवर वाईट परिणाम होता पोषक तत्त्वे शरीराला मिळतील. आहारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच व्यायामाला सुद्धा फार महत्व आहे. चला पाहूया पन्नाशीनंतर वजन कमी करण्यासाठी सोपे व्यायामप्रकार उपायकारक ठरू शकतात:  

ब्रिस्क वॉक (वेगाने चालणे): 

कार्डिओ एक्सरसाईजमध्ये चालणे हा व्यायाम प्रकार सर्वात उत्तम आहे. आठवड्यातून कमीतकमी चार ते पाच दिवस अर्धापाऊण तास जलद चालण्याची सवय लावून घ्या यामुळे चयापचयाची क्रिया सुधारण्यास मदत होईल. चालण्यात नियमितता ठेवल्याने हृदय निरोगी राहील आणि वजन कमी होईल. अर्धा तास चालण्याने २०० कॅलरीज बर्न होतात

धावणे:

हळूहळू कमी वेगात धावण्याची सुरुवात केल्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतील. परंतु तब्येतीवर वाईट परिणाम होईल अशा वेगाने किंवा प्रमाणापेक्षा जास्त वेळ धावू नका. कॅलरीज वेगाने कमी झाल्याने पोटाचा घेर आणि अतिरिक्त चरबी लवकर कमी होऊ शकेल

सायकल चालविणे:

सायकल चालविल्यामुळे पन्नाशी नंतरही पायांतील स्नायू कार्यक्षम राहण्यास मदत होते. स्नायूंवर जास्त ताण येणार नाही अशा पद्धतीने सायकल चालविल्यास वजन कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. अर्धा तास सायकलिंग केल्याने ३३० कॅलरीज बर्न होतात

हे आवर्जून वाचाज्येष्ठांसाठी रोज करावीत अशी सोपी योगासने

योगासने

ज्येष्ठांसाठी करण्यास सोपी आसने म्हणजेच भुजंगासन, बद्धकोनासन, नौकासन आदी आसनांनी पोटाचा घेर आणि मांड्या कमी होण्यास मदत होते. योगासनांचे अवलोकन करून त्याच प्रकारे कृती केल्यास नक्कीच त्याचा शरीराला फायदा होतो

झुंबा नृत्य:

झुंबा या नृत्य प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. नाचताना घाम येऊन शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. झुंबा करताना मन आनंदी राहते आणि वजनही कमी होते. ज्येष्ठांसाठी हा एक आकर्षणाचा विषय ठरू शकतो.  

चालणे, धावणे, जॉगिंग, दोरीउड्या, झुंबा, पॉवर योगा, प्राणायाम यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये २० ते ३० टक्के सुधारणा होते. नियमित व्यायामाने शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते, स्नायू लवचिक बनतात, शरीरातील चरबी कमी होते, चयापचयाच्या गतीत सुधारणा होते, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, स्टॅमिना वाढतो, रक्तवाहिन्या लवचिक होतात, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, आळस नाहीसा होतो, व्यवस्थित झोप लागते. जीवनशैलीत केलेल्या या छोट्या बदलांमुळे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, अन्य हृदयविकार आणि लठ्ठपणा या समस्या निर्माण होणार नाहीत किंवा त्यांची तीव्रता कमी होईल.  

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांमध्ये फिट राहण्यासाठी काही सोपे व्यायामप्रकार 

0

Write a Comment